लोकसभेची पुन:रावृत्ती टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या हालचालींना वेग
दिलीप भोयर
वणी :- नुकत्याच तोंडावर आलेल्या विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभेसाठी पुन:रावृत्ती होऊ नये या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी रद्द करून नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी हालचालींना वेग आल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे.
सन २०१४ ते २०१९ मध्ये मोदी लाटेत निवडून आलेले संजयरेड्डी बोदकुरवार हे भाजपचे २०२४ मध्ये देखील प्रबळ दावेदार म्हणून आज पर्यंत चर्चा होती. परंतु महाविकास आघाडी कडून वणी विधानसभेची उमेदवारी ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाट्याला आल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात ओबीसी कुणबी समाजाचे मतदार मोठ्या संख्येने असून त्यांचे सोबत धनगर,तेली. माळी व इतरही समाज मोठ्या प्रमाणात आहे. सातत्याने प्रस्तापित राजकीय पक्षाकडून ओबीसी सारख्या मोठ्या समाजाला डावलून अल्पसंख्येत असलेल्या समाजातील उमेदवरी देवून बहुसंख्य असलेल्या समाजाला डावल्याने काम सातत्याने सुरू असल्याने लोकसभेत घडलेला प्रकार भाजप अजून विसरला नाही. त्यामुळे येत्या विधानसभेत भाजपा कडून बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजातील उमेदवाराचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकार, माजी नगराध्यक्ष तरेंद्रा बोर्डे, विजय चोरडिया , रवी बेलुरकर तसेच दिनकर पावडे यांच्या नावाची चर्चा सुरू असून यातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वणीचा गड राखणे हा भाजपच्या प्रतीठेचा प्रश्न ?
चंद्रपूर लोकसभेतील चंद्रपूर, बलार्शा, वरोरा – भद्रावती , राजुरा, आर्णी व वणी या सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपच्या मतदानात मोठी घासरम निर्माण झाली आहे. ओबीसी समाजाला एकत्रित बांधून ठेवणारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी न देता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देवून एकाप्रकारे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचे काम भाजपने केले होते. याचाच वचपा मतदारांनी काढत भाजपला चारो खाणे चीत करीत माहविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना ऐतिहासिक मतांनी विजय मिळवून दिला होता. या पराजय भाजपाने चांगलाच मनावर घेतला होता. आता विधानसभेत जर भाजपाला वणी विधानसभेचा गड कायम राखायचा असेल तर नवीन चेहऱ्याला संधी देण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कडून नवीन उमेदवाराचा शोध सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
ऊबाठा गटाकडून तीन नावे चर्चेत
महाविकास आघाडी कडून शिवसेना (ऊबाठा) गटाला उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसैनिकांच्या अश्या पल्लवित झाल्या आहेत. उमेदवारीसाठी माजी आमदार विश्वास नांदेकर, विधानसभा प्रमुख संजय देरकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नावाची चर्चा सुरू असून यातील कोणाच्या वाट्याला उमेदवारी जाईल याची प्रतीक्षा लागली आहे.