मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश
News Today
वणी :- येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील वसंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेवून आपल्या सहकाऱ्यासह पक्ष प्रवेश घेतला आहे. यामुळे वणी विभागात रॉकापला चांगली बळकटी मिळणार आहे.
सामाजिक कामात अग्रेसर असलेले दिलीप भोयर यांनी मागील ४ वर्षा अगोदर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला होता त्यांनी वंचितचे तालुका अध्यक्षपद व नंतर विधानसभा अध्यक्ष अशी त्यांची वर्णी लागली होती. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पण मोठ्या प्रमाणात मजबूत केले होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जय भीम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. ऍड. अंजली साळवे (विटणकर) यांच्या नेतृत्वात तर माजी आमदार संदीप बाजोरिया, व जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते यांचे उपस्थितीत दिलीप भोयर यांचे सोबत बळीराजा पार्टीचे विधानसभा अध्यक्ष रामदास पखाले, वंचितचे तालुका उपाध्यक्ष मंगेश गोरे, वंचीत युवा शाखेचे शहर उपाध्यक्ष मनोज दुर्गे, वंचितचे तालुकासह सचिव प्यारेलाल मेश्राम, निंबाळा येथील माजी सरपंच चंपत पाचाभाई, सामाजिक कार्यकर्ते अतुल पिदूरकर, शरद खुसपूरे, गणराज टेकाम, घाटंजी येथील विलास साबापूरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.