Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeNewsगणेशपूर येथे अमरदीप दुर्गोत्सव मंडळाचा नवरात्रोत्सव उत्साहात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध...

गणेशपूर येथे अमरदीप दुर्गोत्सव मंडळाचा नवरात्रोत्सव उत्साहात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

News Today

वणी : छोरिया टाऊनशिप, गणेशपूर (वणी) येथील अमरदीप दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, परिसरातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना व सरप्राईज गेम, त्यानंतर दररोज सकाळी आरती तसेच सायंकाळी आरती आणि गरबा आयोजित करण्यात आला आहे. नवरात्रातील विविध दिवसांना स्पर्धा, गेम, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, बच्चों एवं महिलाओं के लिए गेम, क्विझ कॉम्पिटिशन आदी कार्यक्रम होणार आहेत.

दि. १६ ऑक्टोबर रोजी मुलांसाठी आरती व गेम, तसेच दि. १७ ऑक्टोबर रोजी क्लर्क डायमंड स्कूलच्या वतीने गरबा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी भक्ती जेमिंग (RAB), तर दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी होम-हवन पूजा, सायंकाळी रक्षा शर्मा यांच्या वतीने मोटिवेशनल स्पीच, आरती/कन्याभोज व महाप्रसाद असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

विजयादशमीच्या दिवशी, २० ऑक्टोबर रोजी सकाळी आरती, सायंकाळी आरती आणि रात्री रावण दहन करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता देवी विसर्जन करण्यात येणार आहे.

या संपूर्ण नवरात्रोत्सवाचे आयोजन अमरदीप दुर्गोत्सव मंडळ, छोरिया टाऊनशिप, गणेशपूर (वणी) यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष अभिषेक भसीम,  सुरेंद्र टोंगे, उपाध्यक्ष,  मनोज पोतनुरवार सचिव व सर्व सदस्य उत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter