Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedराजकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा, नगर नियोजनाच्या विकासासाठी (TPS) वणीकरांच्या मानगुटीवर बसणार...

राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा, नगर नियोजनाच्या विकासासाठी (TPS) वणीकरांच्या मानगुटीवर बसणार टॅक्स वाढीचा राक्षस, मतदारांनो व्हा सावधान,

मामाचा कारनामा – भाग ३

News Today

वणी – नगर नियोजन योजनेच्या (TPS) घोटाळ्याचे धागेदोरे उलगडत असताना आता या योजनेचा सर्वात भयावह चेहरा समोर येऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून, नियमांना पायदळी तुडवून, पर्यावरणाची राखरांगोळी करत ‘सोन्याची खाण’ आपल्या खाजगी टोळीला देण्याचा कट रचणाऱ्या टोळक्याने आता योजनेच्या विकासाचा संपूर्ण आर्थिक बोजा वणीकरांच्या माथी मारण्याची तयारी केली आहे.

खरे तर सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावरून जाणारा हा विषय आहे. जेवढ दिसते तेवढाच आम्ही विचार करतो, गोरगरिकांनी केवळ कष्ट करायचे आणि सरकारची तिजोरी भरायची आणि धन राजकीय प्रतिनिधी तो जमा झालेला निधी धन डानग्यांची तिजोरीत भर पडण्यासाठी योजना आखून त्यावर निधी खर्च करायचा हा वणीच्या राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून खाजपचे माजी आमदार बोडकुडवार यांनी थंड डोक्याची शिजवलेला एक कट आहे. 

शहरवाढ, पायाभूत सुविधा, रोड–ड्रेनेज, लाईट्स, उद्याने—हे सगळे TPS योजनेनुसार शासकीय निधीतून किंवा नियमानुसार होणे अपेक्षित असताना, वणीतील योजनामध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे.

ज्यांनी कट रचला, ज्यांनी शेतजमिनी काबीज केल्या, ज्यांनी करोडोंची सोन्याची खाण उभी केली—त्यांना फायदा. आणि ज्यांचा या कारस्थानाशी काही संबंध नाही अशा वणीकरांना भरायचा कर

 

वणीकरांच्या मानगुटीवर बसणार अतिरिक्त टॅक्सचा राक्षस”

सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांची आणि हितचिंतकांची बडदास्त ठेवण्याची किंमत आता सर्वसामान्य वणीकरांना मोजावी लागणार आहे. TPS विकासासाठी प्रचंड निधी आवश्यक आहे.

तो कुठून येणार?
शासनाकडून? नाही.
व्यापाऱ्यांकडून? अजिबात नाही.
जमिनी गिळंकृत करणाऱ्या बड्या मांडवळ्यांकडून? नाहीच.

हा सगळा बोजा आता कराच्या नावाखाली वणी शहरातील नागरिकांच्या खिशातून काढण्याचा डाव आखला जातो आहे.

लोकांच्या अंगावर कराचे नवे–नवे बोजे टाकून TPS विकासाचा खर्च चुकता केला जाणार अशी चर्चा वेग घेत आहे. कर भरायचा वणीकरांनी आणि नफा मिळवायचा खासगी हितसंबंधी आणि व्यापाऱ्यांनी—ही तर थेट लूट!
विकास नाही, केवळ “व्यापारी विकास”

वणीतील स्थानिक नागरिकांचा प्रश्न अगदी थेट आहे—
“TPS प्लानमुळे वणीचा विकास होणार की काही मोजक्या व्यापाऱ्यांचा?”

उत्तर स्पष्ट आहे.
ज्या पद्धतीने जमीनविक्रीचे खेळ झाले, झोन बदलले गेले, शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला—ते पाहता हा प्लान वणीच्या विकासासाठी नव्हे, तर काही जणांच्या संपत्ती वाढवण्यासाठी उभारलेला प्रकल्प असल्याचे चित्र लोकांसमोर येऊ लागले आहे.

कर भरताना वणीकर विचारणार – आमचे कसले पाप?

वणीकरांना कर लादून, घरगुती कर वाढवून, प्रॉपर्टी टॅक्स वाढवून किंवा विकास शुल्क उभारून पैसे गोळा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
शहराचा विकास करावा याबद्दल कोणालाही आक्षेप नाही, परंतु— शेतकऱ्यांना फसवून उभारलेला TPS,

बड्या लोकांना फायद्याचा, सामान्य माणसाच्या खिशाला झळ पोहोचवणारा, आणि पर्यावरणाला धोका पोहोचवणारा—

असा प्रकल्प लोकांच्या अंगावर कराच्या रूपाने का टाकायचा?

वणीमध्ये संतापाची लाट

या सर्व प्रकारामुळे वणीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
स्थानिकांचा आरोप असा—
“वणीचा विकास थांबवून, आमच्या खिशातून पैसा काढून खासगी हितसंबंधींचे साम्राज्य उभे करण्याचा पापकारभार आम्ही का सहन करावा?” असा सवाल वणीतील प्रत्येक जागृत मतदारांमध्ये निर्माण होत आहे.

त्यामुळे या राजकीय माजी आमदार मामाला यावेळी चांगलाच धडा शिकविण्यासाठी जनता सज्ज झाली आहे.

TPS घोटाळ्याने आधीच ज्वाला पेटल्या आहेत. आता या करराक्षसामुळे ही आग आणखी धगधगणार हे निश्चित.

             भाग चार मध्ये  बघायला मिळणार ७/१२ 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter