Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपितळी कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आर. एस. गवई बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

पितळी कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आर. एस. गवई बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

News Today

यवतमाळ : स्मृतीशेष आर. एस. गवई बहुद्देशीय संस्थेमार्फत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जात असून, यामध्ये शिक्षण, क्रीडा, तसेच धार्मिक-सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास विशेष प्राधान्य दिले जात आहे.

संस्थेमार्फत बालआश्रम व शाळा दत्तक घेणे, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा-साहित्य उपलब्ध करून देणे यासह लहानशा गावात बुद्धविहार उभारणी व धार्मिक स्थळांच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने विविध पितळी मूर्ती व कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

यामध्ये – छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हंस मूर्ती, हत्तींची जोडी, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पितळी स्मारक अशा विविध आकर्षक व कलात्मक वस्तूंचा समावेश आहे.

या कलाकृतींच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्यांच्या परंपरेत असलेली पितळी कलाविश्वाची परंपरा जपून ठेवणे, तसेच सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात या कलाकृती उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश असल्याचे संस्थेच्या संचालिका काजल ताई गवई यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी व खरेदीसाठी 📞 9307926564 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter