News today
वणी: महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांसाठी असलेल्या अधिकृत स्टिकरचा गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना वणी येथे उघडकीस आली आहे. माजी आमदार बोदकूरवार यांच्या एम.एच. २९ ए. आर. ६०८६ या क्रमांकाच्या खासगी इनोव्हा वाहनावर “तसेच त्यांच्या फॉर्च्यूनर अश्या दोन्ही वाहनावर महाराष्ट्र विधानसभा मा. आमदार” असे स्टिकर लावण्यात आले आहे. त्यांनी बोदकुरवार यांचा संताप जनक प्रतापाने जनमानसात रोष व्यक्त होत आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आणि विधानमंडळाच्या सदस्यांची ओळख पटवण्यासाठी हे स्टिकर्स जारी केले जातात. मात्र, माजी आमदारांनी अशा स्टिकरचा वापर करणे नियमांचे उल्लंघन असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे अधिकृत व्यक्ती ही तोतयेगिरी करत आणि इतरांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात माजी आमदार बोदकूरवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, त्यांच्या वाहनावर असलेले स्टिकर अनेक नागरिकांनी पाहिले असून आश्चर्य व्यक्त केले आहे.
आता प्रश्न असा आहे की, माजी आमदारांनी हे स्टिकर का लावले आणि यामागील त्यांचा हेतू काय आहे? तसेच, या गंभीर प्रकारावर विधानसभा प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे शासकीय स्टिकर्सच्या वितरणा आणि वापरावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जाणकार व्यक्तींचे मत
माजी आमदारांना त्यांच्या वाहनावर ‘आमदार’ किंवा तत्सम पदनाम दर्शवणारे स्टिकर लावण्याची अनुमती नसते.
नियमानुसार, हे स्टिकर्स केवळ विद्यमान आमदारांना त्यांच्या कार्यकाळात वापरण्याची परवानगी आहे. एकदा आमदारकीचा कार्यकाळ संपला की, त्या स्टिकरचा वापर करणे गैरकानूनी ठरते आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन मानले जाते.
माजी आमदार आता लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, त्यांना अशा कोणत्याही विशेषाधिकाराचा वापर करण्याचा हक्क नाही. त्यामुळे, त्यांनी आपल्या वाहनावरून आमदारकीचे स्टिकर तात्काळ काढून टाकणे आवश्यक आहे. जर कोणत्याही माजी आमदारांनी नियमांचे उल्लंघन करून स्टिकरचा वापर केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र राज्यातील आज पर्यंतच्या कोणत्याही आमदाराने अशी स्टिकर लावले नाही. कारण ते कायद्यात बसत नाही.
असे करणे म्हणजे कायद्याला मूठमाती देऊन मुजोरी करणे असे होते. असे मत एका जाणकार व्यक्तींनी नाव न टाकण्याच्या अटीवर दिली आहे. या प्रकारामुळे जन माणसात भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.