News Today
वणी :- गिट्टी खदान मध्ये उत्खनन करण्यासाठी जात असलेला प्रोकलॅन अचानक नियंत्रण सुटले व तो ८० फूट खोल खाणीत पडल्याने चालक गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना वणी तालुक्यातील मोहदा येथे काल तारीख १६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.
मोहदा येथे मोठ्या प्रमाणात गिट्टीसाठी लागणारा दगडाच्या खाणी असून दररोज हजारो ब्रास दगडाचे उत्खनन केल्या जात आहे.या परिसरात १२ ते १५ गिट्टी क्रेशर असून कार्यान्वित आहे. या क्रेशरसाठी लागणारा दगळ उत्खननासाठी हजारो हेक्टर जमिनीवर उत्खनन करणाऱ्यांसाठी शासकीय लिजवर जमिनी वाटप करून खदाणी निर्माण केल्या आहे.
मोहदा येथील क्रेशर मालक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांच्या नावे असलेल्या गिट्टी खदानीत काल रात्री १० वाजता च्या सुमारास राणू अहिरवार वय २६ वर्षाचा चालक हा प्रोकलॅन मशीन घेऊन उत्खननासाठी जात असता त्याचे प्रोकलॅन चालवित असताना संतुलन सुटले व ८० ते ९० फूट खोल खदाणीत प्रोकलॅन कोसळले असता यात चालक राणू अहिरवार रा. मोहदा हा चालक गंभीर जखमी झाला होता त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
संबंधित खदाण मोहदा गावातील गट क्र. २८३ मध्ये असून त्या खदाण ची लिज ही संपली असल्याची चर्चा आहे. गावातील काही नागरिकांनी ती खदाण गावा जवळ आहे म्हणून बंद केली होती. गावातील नागरिकांनी प्रशासन अधिकाऱ्याकडे त्या खदाण ची एटीएस मोजणीची मागणी पण केली होती त्यावर काही कार्यवाही केली गेली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उचित चौकशीची मागणी होत आहे.
घटना स्थळावर पोलिस दाखल
वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहदा येथे काल रात्री घडलेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे आपल्या ताफ्यासह आज तारीख १७ रोजी दुपारी १२.३० वाजता दाखल झाले आहे.