News today
वणी :- वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी काल विजयाचा गुलाल उधळला आणि आज दुपारी १ वाजता ते यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांच्या भेटीला यवतमाळकडे रवाना झाले आहे.
महाविकास आघाडी कडून वणी विधानसभा क्षेत्राकरिता शिवसेना (उबाठा) गटकडून संजय देरकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार संजय देखमुख यांचा अनमोल वाटा आहे. तसेच त्यांनी निवडणुकीच्या संपूर्ण प्रचार व जाहीर सभेकरिता वणीत येवून अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले होते.
काल विधानसभेच्या निवडणुकीचा लागलेल्या निकालात संजय देरकर हे १५ हजाराचेवर मतांनी विजय मिळवला आहे. संजय देरकर यांना विजय मिळताच महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व समाज बांधवांनी येवून आमदार संजय देरकर यांना रात्री उशिरा पर्यंत भेट घेवून शुभेच्छा दिला. तसेच आज तारीख २४ रोजी सकाळी देखील हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिला. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून आमदार देरकर हे खासदार संजय देशमुख यांच्या भेटीला यवतमाळ येथे रवाना झाले.