News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील छ. शिवाजी महाराज चौकात evm असलेल्या गोदामजवळ बोगस दस्त असलेले वाहन संशयास्पद आढळले व ते पोलीसात जमा करताच भाजप जिंकतील अश्या लावलेल्या करोडीच्या शर्यती अचानक सट्टा बाजारातून रद्द व्हायला लागल्या आहे. अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे.
ता. २० नोव्हेंबर संपन्न झालेल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल येत्या २३ रोजी लागणार असून जनतेतून महाविकास आघाडीचे वातावरण असताना आज सकाळ पासून भाजप निघतील अश्या पद्धतीच्या शर्यती सट्टा बाजारात सुरू झल्या होत्या यावर सट्टेबाजांनी भाजपचे दर पाडून भाजपला शर्यतीत आणले होते.
परंतु evm मशीन ठेवलेल्या गोदामजवळ संशयास्पद वाहन इलेक्ट्रिक साहित्यासह आढळले व ते पोलीसात जमा करताच भाजप जिंकते म्हणणारे सट्टेबाज अचानक करोडो रुपयाच्या शर्यती कॉल करून परत करायला लागले आहे. अशी माहिती पोलिस स्टेशन समोर जमलेल्या हजारो लोकांमध्ये सुरू होती.
सदर संशयास्पद वाहन पोलिस स्टेशन मध्ये कारवाईसाठी लावताच सर्च उमेदवार पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले परंतु भाजपचे कोणतेही प्रतिनिधी मात्र उपस्थित झाले नाही हे विशेष.