महाविकास आघाडी कडून संजय देरकर आज नामांकन दाखल करणार, हजारो समाज बांधव आज एकत्र येणार
वणी :- विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटांचे अधिकृत संजय निळकंठ देरकर आज तारीख २९ रोजी भव्य महारॅलीने महाविकास आघाडी कडून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटामाटात निवडणूक निर्णय अधिकारी वणी यांचेकडे दाखल करणार आहे. यावेळी त्यांचे सोबत तमाम शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचेसह हजारो समाज बांधव स्वयंपूर्तीने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
वणी विधानसभेत मागील दहा वर्षापासून शेठजी, भटजी, आणि लाटजी असलेल्या भाजप पक्षाच्या खोट्या भूलथापांना बळी पडून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमुरांनी भाजपवर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. परंतु या भारतीय जनता पार्टीने मात्र महागाई, बेरोजगारी वाढवून सर्व सामान्य शेतकरी शेतमजुरांचे मात्र जगणे अवघड करून ठेवले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव अधिक ५०% नफा देवू असे आश्वासन भाजपा कडून देखील देण्यात आले होते. पण या भाजपाने सन २०१४ मध्ये जो भाव कापसाला व सोयाबीनला मिळत होता त्यांच्या निम्म्यावर आजमितीस आणून ठेवला आहे. ना कापसाचे भाव वाढले, ना सोयाबीनचे भाव वाढले, किंबहुना होते त्यापेक्षाही अर्धे करून बी बियाणे, रासायनिक खते, आणि फवारणीसाठी वारण्यात येणाऱ्या ओषधांचे भाव दाम दुप्पट करून व्यापाऱ्यांचे अच्छेदिन आणले येवढेच नाही तर जी.एस टी. सारखा मोगली कर आकारून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
त्यामुळे या भाजप सरकारवर शेतकरी प्रचंड कोपला आहे. शेतकऱ्याचे मतांवर निवडून येवून व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेवून शेतकरी आर्थिकरित्या बर्बाद केल्याने संतापलेल्या शेतकर्यांनी आता भाजपच्या विरोधात खुले बंड पुकारले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे काल तारीख २८ रोजी भाजपचे उमेदवार आ. बोदकुरवार यांच्या नामांकन रॅलीला तेलंगणातील कार्यकर्त्यांना गर्दी दाखविण्यासाठी पाचारण करावे लागले होते.
शेतकरी ध्येय व धोरण विरोधी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शिवसेनेची मशाल हाती घेवून शेतकरयांना न्याय मिळवून देण्यासाठी संजय देरकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी,शेतमजूर व विविध समाज बांधव स्वयंपुर्तीने एकत्रित येवून देरकरांच्या खांद्याला खांदा लावून उमेदवारी नामांकन दाखल करण्यासाठी आयोजित रॅलीला उपस्थित असणार असल्याची माहिती आहे.
ही रॅलीला जत्रा मैदानातील हनुमान मंदिरातून दुपारी १२ वाजता निगणार असून या रॅलीला महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस पार्टीकडून माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेनेकडून माजी आमदार विश्वास नांदेकर , तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व दिलीप भोयर यांनी केले आहे.
कॉम्रेडचा संजय देरकरांना पाठिंबा
भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मास्कवादी) यांनी वणी वणी विधानसभेचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तरी महाविकास आघाडीच्या नामांकन दाखल रॅलीत सर्व काम्रेडच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महासचिव ऍड. कुमार मोहरमपुरी, राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. दिलीप परचके, जिल्हा उपाध्यक्ष मनोज काळे यांनी केले आहे. अनेक छोट्या मोठ्या पार्टी आणि सामाजिक संघटनेचा पाठिंबा संजय देरकर यांना मिळत असल्याने देरकरांचे पारडे जड होत आहे.