Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अवहेलना, टक्केवारी सरकारच्या ढिसाळ कारभाराचा संभाजी ब्रिगेड कडून जाहीर निषेध व दोषींवर कार्यवाहीची मागणी

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अवहेलना, टक्केवारी सरकारच्या ढिसाळ कारभाराचा संभाजी ब्रिगेड कडून जाहीर निषेध व दोषींवर कार्यवाहीची मागणी

News Today 

प्रतिनिधी

वणी :- छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे.असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. 

त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे.आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे आपण ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वणी च्यावतीने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना  तहशिलदार वणी यांचार्फत पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजयभाऊ धोबे, मराठा सेवा संघाचे अंबादास  वागदरकर, भाऊसाहेब  आसुटकर, आशिष रिंगोले, संजय गोडे, अमोल लोखंडे, दत्ता डोहे, ॲड. अमोल टोंगे, अभय पानघाटे, आबीदभाई हुसेन, वसंता थेटे, अरुण डवरे, नितीन मोवाडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.