Ticker

6/recent/ticker-posts

झरी-जामणी तालुक्यातील मनसेचे नेते जीवन तोडसाम यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश

 


News Today 

प्रतिनिधी

झरी:- झरिजामनी तालुक्यातील महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे पदाधिकारी जीवन तोडसाम यांनी नुकताच विश्राम गृहात  दिनांक ६ सप्टेंबर रोजी  शिंदे गटाच्या शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील झरी - जामणी तालुक्यातील मनसे चे तडफदार नेतृत्व म्हणून जीवन तोडसाम यांची ख्याती आहे. यांनी मार्की परिसरातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व स्वीकारत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा शिवसेना उपनेते व पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात , यवतमाळ जिल्हा सहसंपर्क प्रमुख  विनोद मोहितकर यांच्या हस्ते प्रवेश घेतला. 

यावेळी झरी चे तालुका प्रमुख मोरेश्वर सरोदे , झरी शहर प्रमुख नानाभाऊ सुगंधे , झरी युवासेना तालुका प्रमुख बाळू चेडे, वणी शहर प्रमुख ललित लांजेवार , सुनील डोंगरे , सुमीत केशवाणी , राहुल उपाते , यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . श्री जीवन तोडसाम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . जीवन तोडसाम हे आदिवासिंचे एक लढवैय्या कार्यकर्ते असून त्यांची आदिवासी समाजात चांगली पकड असल्याने शिवसेना ( शिंदे ) झरी - तालुक्यात मजबूत होईल असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.