Ticker

6/recent/ticker-posts

महिलांवरील अत्याचारा विरोधात निर्भय नारी विचार मंच उतरणार रस्त्यावर

 


बुधवार ता. ४ सप्टेंबरला पांढरकवडा येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन  

 पांढरकवडा 

प्रतिनिधी :-  मणिपूर हातरस कोलकाता, दिल्ली चंद्रपूर वरोरा उरण, बदलापूरच्या घटनांमधील महिलांवरील अत्‍याचाराविरोधात आता तालुक्यातील निर्भय नारी विचार मंच मैदानात उतरला आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच चिरडून टाकण्याची आज वेळ आली आहे, असा रोष  निर्भय नारी विचार मंचाकडून व्यक्त केला जात आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर वरोरा येथील दोन शिक्षकांनी मिळून विद्यार्थिनीचा विनयभंग बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याचा निषेध म्हणून पांढरकवडा येथील कचेरीवर ता. ४ सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

याआधी उरण येथील यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्यावरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. राज्यात अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडत आहेत. महिला, मुली आणि बालकांना संरक्षण देणे, सरकारची जबाबदारी आहे. माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात तुम्ही पैसे भराल; पण त्यांचे संरक्षण कसे करणार, असा प्रश्‍न महिलांनी  उपस्थित केला आहे. आजही अनेक घरांत तसेच समाजातही महिलांकडे मालकीची वस्तू, उपभोगाचे साधन म्हणून बघायची दृष्टी समाजच देत असतो. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था त्‍याला अपवाद नाही. आपल्या हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हा पुरुषांचा दृष्टिकोनच महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरत आहे. याचाच निषेध करत दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ रोजी मिञ क्रीडा मंडळ पांढरकवडा येथून दुपारी १२.०० वाजता महिलांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मार्ग क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक अग्रेसन चौक दीपक जनरल चौक व तहसील कार्यालय येथे सभेचे आयोजन येथे निषेध नोंदवून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार पांढरकवडा यांना निवेदन देणार आहे.  वाढत्या महिला अत्याचाराविरोधात सरकार सक्त कारवाई करणार का, असा प्रश्न आहे. शाळेची वास्‍तू असलेले विद्यामंदिर मुलींसाठी अत्यंत सुरक्षित समजले जायचे; परंतु आता परिस्‍थिती बदलली आहे. ज्या शाळांमध्ये असे प्रकार घडतात, अशा शैक्षणिक संस्थांसह त्या शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची गरज आहे. मुलींचे संरक्षण करणे संबंधित शाळांची जबाबदारी आहे. रायगड जिल्ह्यातील पोक्‍सो न्यायालय पुन्हा सुरू करावे, तसेच संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून पीडितेला न्याय देणे गरजेचे आहे. नराधमाच्या मनात शासनाचे व जनतेच्या रोषाचे भय निर्माण व्हावे व शासनाने महिला सुरक्षेसाठी विशेष कायद्याची तरतूद करावी व नराधमाला भर चौकात फाशी द्यावी व महिलांच्या विविध मागणीसाठी जागृत नारी म्हणून जास्तीत जास्त महिलांनी स्वतःसाठी व आपल्या लेकीसाठी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती आयोजकांनी केली आहे निर्भय नारी विचार मंच आयोजिका सुवर्णा वरखडे वाणी तोडासे डॉ विद्याश्री आत्राम नीता मडावी मनीषा गोरलेवार यांनी मोर्चासाठी परिश्रम घेत आहे. या मोर्चाला सर्व सामाजिक,राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.