Ticker

6/recent/ticker-posts

आई पासून हरवलेल्या बालकाची युवा कार्यकर्त्यांनी घडवून आणली भेट, यवतमाळ येथील घटना

 

News Today 

प्रतिनिधी

यवतमाळ :-  येथील बस स्थानक परिसरात एका बस मध्ये अनवधानाने प्रवास करीत आलेला चेतन गजानन उईके या ७ वर्षीय बालकाला त्याच्या आई सोबत भेट घडवून आणण्यासाठी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गायकवाड यांनी परिश्रम घेतल्याने एका बालकाला आईची भेट घडताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.


मोबाईल जीवनात चांगला तर आहे पण त्याचे दुष्परिणामही प्रचंड आहे. आई मोबाईल मध्ये गुंग असताना एक सात वर्षीय मुलगा चेतन गजानन उईके गाडीमध्ये बसून यवतमाळ मध्ये आला हा मुलगा बेपत्ता आहे याची माहित पडताच निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे रुग्णसेवक अभिषेक गायकवाड यांनी तात्काळ धाव घेतली त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं त्याला खाऊ पिवू घालून सरळ अवधूत वाडी पोलीस स्टेशन येथे त्या मुलाला नेले तेथून त्याची चौकशी करीत त्याच्या आईचा शोध घेतला व लवकरच त्याची आई मिळून आली. आपल्या परिवारास भेटून फार बालक आनंदित झाला  आणि सुखरूप घरी पोहोचला सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीस विभागांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आई व बालकाची भेट झाली. यावेळी अवधूत वाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर उपनिरीक्षक गणेश शिंदे आणि संपूर्ण पोलीस कर्मचारी  तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गायकवाड निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे कृतिका मेश्राम उमेश मेश्राम दारूबंदी व्यसनमुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत लांबट नंदादीप फाउंडेशनचे नंदादीप फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.