Ticker

6/recent/ticker-posts

बाबापुर येथील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांचा ऑटो पलटला , १० जण...

 


 News Today 

दिलीप भोयर

वणी :- तालुक्यातील बाबापुर (कायर) येथील प्रसिद्ध असलेला गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या झरिजामनी तालुक्यातील मौजा मांगली येथील भाविकांचा ऑटो आज ता. १५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास मोहदा वेळाबाई मार्गावर पटल्याने ऑटो चालकासह १० जण जखमी झाले असून दोन महिला गंभीर असल्याची माहिती आहे. 

 बबापुर येथील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुरदुरून भाविक हजारोच्या संख्येने येत असतात असेच मांगली येथील काही भाविक आज बाबापुर येथे दर्शनासाठी गेले असता कायर मार्गाने प्रचंड गर्दी असल्याने बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांचा ऑटो बोरगाव मार्गे वेळाबाई ,मोहादा, पुरड अश्या मार्गाने पाठवले होते. वेळाबाई मोहदा मार्ग हा पुर्णतः उद्ध्वस्त होऊन असल्याने कोणत्याही प्रवाश्यांना मार्ग भ्रमण करणे कठीण होत आहे. मार्गावर मोठ मोठ खड्डे पडले असून मार्ग अत्यंत बिकट झाला आहे. अश्या मार्गाने भक्तानां पाठवणे भक्तांच्या जीवावर बेतला जात आहे. समोरून येणाऱ्या ट्रकच्या लाईटमुळे ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले व ऑटो सरळ खड्ड्यात पलटल्याने यात सुजाता पाटील, लक्ष्मीबाई ढोके यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून हात फॅक्चर झाल्याचे बोलल्या जात आहे तर , लक्ष्मीबाई पोंगलवार, कलावती नाम्पलीवार, सुरेखा राजूलवार, शारदा राखुंडे, प्रिया वाघाडे, सखुबाई तुमाने, संगीता सोर्ते, आणि चालक सुभाष धोटे हे सर्व राहणार मांगली ( मुकुटबन) येथील रहिवासी आहे. पलटलेल्या ऑटोचा क्रमांक MH29 - M6623 असा आहे. जखमींना उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. ऑटो पलटल्याची माहिती मिळताच मोहदा येथील काही तरुणांनी धाव घेत जखमींची मदत केली.