Ticker

6/recent/ticker-posts

बैलजोडी चोरट्यांना २४ तासात पोलिसांनी घेतले ताब्यात

 

                शिरपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक

News Today 

दिलीप भोयर

वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कृष्णानपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून बैलजोडी चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या २४ तासात शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संपूर्ण तालुक्यात शिरपूर पोलिसांचे कौतुक केल्या जात आहे. 

शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णानपुर येथील नामदेव दादाजी लांडे वय ५० या शेतकऱ्याची एक लाख २० हजार रुपये किमतीची बैलजोडी शेतात बांधून असतांना  अज्ञात चोरट्याने शेतातून ता. १४ सप्टेंबर रोजी चोरून नेल्याची घटना घडली होती.  या संबंधी शेतकऱ्याने शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली असता  तक्रार दाखल होताच ठाणेदार माधव शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासात भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी ताब्यात घेत, चोरीत वापरण्यात आलेल्या वाहनासह तिघांना जेरबंद केले आहे.

  सदर  गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी  उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश किंन्द्रे व ठाणेदार माधव शिंदे यांनी बिट अंमलदार सह भेट देवुन कृष्णापुर येथील गावक-यांना रात्रीच्या वेळी गावात बाहेर गावाचे लोक आले होते का? याबाबत तपास करतांना काही बाहेर गावचे लोक गावात आले असल्या बाबत माहीती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी संशयीता बाबत तांत्रिक तपास केला असता बैलजोडी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात संशयीत आरोपी भोलाराम सुरेश पडोळे वय 33 वर्षे रा.डोर्ली ता.वणी जि. यवतमाळ याला तात्काळ अटक केली. भोलाराम ची कसून चौकशी केली असता त्याने व ईतर 2 संशयीत आरोपीतांनी बैल जोडी चोरल्याची कबुली दिली.  तसेच सदर बैल जोडी त्याचे पिक अप वाहनाने भंडारा येथे नेल्याची कबुली दिली. त्यावरुन शिरपूर ठाणेदार माधव शिंदे यांनी रातोरात भंडारा येथे पोलीस पथक पाठवुन चोरी गेलेली बैलजोडी हस्तगत केली. यात चोरी गेलेली एक लाख २० हजार रुपये किमतीची चोरी गेलेली बैलजोडी व  तीन लाख रुपये किमतीचे पिक अप वाहन असा एकूण चार लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अवघ्या २४ तासात हस्तगत करीत तिघांना जेरबंद केले आहे.  यातील अटक करण्यात आलेला आरोपी व ईतर संशयित आरोपी विरुध्द पुढील तपास सुरु आहे.

     सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर पोउपनि. रावसाहेब बुधवत,  गंगाधर घोडाम  गजानन सावसाकडे चालक विजय फुल्लुके यांनी पार पाडली आहे.