Ticker

6/recent/ticker-posts

वागदरा येथील अवैध्य उत्खनन प्रकरणी कारवाईस विलंब

अवैध्य उत्खनन प्रकरणी पंचनामा करताना मंडळ अधिकारी व तलाठी 

          प्रशासनाचा आळस की , सत्ताधाऱ्यांचा दबाव

वणी :- येथील वागदरा नजीक सर्व नंबर १०७/२अ च्या बाजूला असलेली सरकारी जागेवरील टेकड्या अवैध्य उत्खनन करून सुमारे ८५० ब्रास मुरूम ट्रॅक्टर व्दारे वाहतूक करून हळप करण्यात आल्या प्रकरणी ४८ तासाचा कालावधी लोटूनही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सदर प्रकरणी प्रशासन आळसी झाल की यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव वाढला अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे. 

वणी येथील वागदरा नजिक असलेल्या सर्वे नंबर १०७/२अ ही शेतजमीन वणीतील व्यापारी पंकजकुमार भंडारी यांच्या मालकीची असून यांनी यांच्या शेता जवळील असलेल्या सरकारी जागेवर नैसर्गिक टेकड्या खोदून त्यावरील मुरूम हळप केला आहे. सुमारे ७८० चौरस मीटर जागा खोदण्यात आली असून यावरील ८५० ब्रास मुरूम विना रॉयल्टीने वाहतूक करण्यात आल्याचा प्रथम दर्शी पंचनामा अहवाल मंडळ अधिकारी राजू डोंगरे व तलाठी बन्सीलाल सिडाम यांनी तहसील प्रशासनाला तारीख १३ सप्टेंबर रोजी दिला आहे.

परंतु या प्रकरणी अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा नोंद न झाल्याने हा प्रचंड चर्चेचा विषय शहरात बनला आहे. यावर कारवाई न करण्यासाठी शहरातील व्यापारी लॉबी एकसंघ होऊन अधिकारी वर्गावर राजकीय दबाव आणत असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास विलंब लावत असल्याचे बोलल्या जात आहे. 

गरिबांना केली तर चोरी, व्यापाऱ्यांनी केली तर प्रतिष्ठा 

एखाद्या गोरगरीब इसमाने एखादे ट्रॅक्टर मुरूम खोदून आणला तर त्यावर प्रशासन तत्काळ कारवाईचा बडगा उचलत असतात परंतु येवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवत उत्खनन केले असून प्रशासन मात्र गम गुमान गप्प बसून आहे. त्यामुळे गरिबांनी केली तर चोरी आणि व्यापाऱ्यांनी केलेले कृत्य म्हणजे प्रतिष्ठा आहे का असा सवाल निर्माण झाला असून प्रशासनाने सर्वांसाठी एका नियमाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

शासकीय जागा व्यापाऱ्यांची दाखवून कारवाई  हडप करण्याच्या मार्गावर

सदर प्रकरणातील जागा ही शासकीय असताना देखील या जागेवरच उत्खनन हे व्यापाऱ्याचा ७/१२ दाखवून ही कारवाई राजकीय दबावापोटी हडप करण्याचा जोरदार प्रयत्न प्रशासनाकडून केल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.