Ticker

6/recent/ticker-posts

वागदरा नजीक शासकीय जागेवर शेकडो ब्रास मुरमाचे अवैध्य उत्खनन

 

तहसील कार्यालयाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष 

News today 

दिलीप भोयर

वणी :- येथून जवळच असलेल्या वागदारा नजिक शेत सर्व नंबर १०७/२  जवळील शासकीय जागेवर अवैध्यरित्या  शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळताच स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शेतातील उत्खननाबाबत तारीख १३ रोजी  पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तहसील प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची माहिती असून उत्खनन करणारी जेसीबी देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यात लाखो रुपयाचा मुरूम फस्त केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाची उचित चौकशी सुरू आहे.

शेतसर्वे नंबर १०७/२अ या शेता लगत असलेल्या शासकीय जमिनीचे उत्खनन पंकजकुमार बन्सीलाल भंडारी यांनी केला असून यातील ८५० ब्रास मुरूम ट्रॅक्टर व्दारे वाहतूक केला असल्याचे आरोप आहे. मागील अनेक दिवसापासून जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केल्या जात होते. सुमारे ७८० चौरस मीटर जमिनीचे उत्खनन केले असून यात शेकडो ब्रास मुरूम खोदकाम झाले आहे. या शासकीय जागेवरच खोदकाम करण्यासाठी तहसील प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सदरचे खोदकाम हे बेकायदेशीर असल्याचा ठपका स्थानिक मंडळ अधिकारी राजू डोंगरे ,  तलाठी बन्सीलाल सिडाम यांनी आपल्या पंचनाम्यात केला असून येवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई तहसील प्रशासन करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

                     पुरातन हिंदू मंदिराला धोका

शासकीय जागेचे उत्खनन करून पुरातन हिंदू मंदिराकडे जाण्याचा मार्ग देखील बंद पडला आहे. आणखी थोड्या प्रमाणात हे उत्खनन झाले असते तर या मंदिराला देखील धोका निर्माण झाला असता अशी चर्चा वागदरा परिसरात चालू असून येवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असताना स्थानिक महसूल प्रशासन डोळे झाक का करीत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्खनन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.