Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 ने स्वामींनी कुचनकर सन्मानित

 

News Today 

प्रतिनिधी

वणी :-  येथील स्वामींनी प्रशांत कुचनकर इयत्ता आठवी डि. ए. वी. पब्लिक स्कूल सुंदरनगर मध्ये शिक्षण घेत असलेली विध्यार्थीनीला 2024 चा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहेत.

स्वामींनी ने नर्सरी ते इयत्ता आठवी पर्यंत च्या काळा मध्ये तिने विविध प्रकारच्या व्यासपिठा वरून ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आय. पी. एस. विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श समोर ठेऊन तिने अनेक ठिकाणी वक्तृत्व सादर केलेले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती सुद्धा विविध व्यासपीठावरून प्रकाश टाकण्याच्या अल्पसा प्रयत्न केलेला आहेत. स्वामींनी ने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संदीप पाटील भा. पो. से. श्री प्रकाश पोहरे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे अश्या अनेक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तीमत्वाच्या मुलाखती घेतल्या असून स्वामींनी ने सुंदर स्केच सुद्धा रेखाटनं करण्याचा छदं जोपासलेला आहेत. तिने राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वास नांगरे पाटील तसेच पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन उपसचिव श्रीकर परदेशीं भा. प्र. से. यांचे स्केच रेखाटून त्यांना भेट सुद्धा दिले आहेत.

पुणे येथील युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 हा पुरस्कार स्वामींनी ला प्रदान करतांना संस्थेला अत्यानंद होत आहेत. स्वामींनी ने केलेल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल व घेतलेले अथक परीश्रम याची दखल घेऊन स्वामींनी ला महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. आपल्या क्षेत्रातील आपले योगदान भविष्यात आणखी प्रभावी होईल याची खात्री आहेत. त्यासाठी संस्थेने स्वामीनी ला शुभेच्छा दिल्या.

स्वामींनी ला हा पुरस्कार मुबंई येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणार होता. परंतु स्वामींनी च्या शैक्षणिक परीक्षा सुरु असल्यामुळे तिला कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. संस्थेने हा पुरस्कार पोस्ट मार्फत प्रदान करण्यात आला.स्वामींनी या पुरस्काराचे श्रेय विश्वास नांगरे पाटील तसेच संदीप पाटील भा. पो. से. यांना देत आहेत.