Ticker

6/recent/ticker-posts

वणीत विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' संपन्न

 

            ९७४स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग..

सौरव,प्रणय,सलोनी, लावण्या प्रथम पुरस्काराचे मानकरी! 

वणी दि.

येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त  आयोजित विदर्भस्तरीय 'आझादी की दौड ' स्पर्धेला विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पंधरा वर्षांवरील खुल्या गटातून पुरुष विभागात सौरव तिवारी (नागपूर) याने प्रथम क्रमांक तर महिला गटातून सलोनी लव्हाळे (भातकुली, अमरावती ) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दहा वर्षांवरील व पंधरा वर्षांआतील मुलांच्या गटात प्रणय उपासे (ब्रह्मपुरी) याने प्रथम क्रमांक तर मुलींच्या गटात लावण्या नागरकर(चंद्रपूर) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या चारही धावपटूंना पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि सोनेरी पदक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.पंधरा वर्षांवरील खुल्या गटातून साईनाथ पुंगाटी (भामरागड) द्वितीय तर महिला गटातून -अंजली मडावी ( नागपूर) हिचा द्वितीय क्रमांक आला.

दहा वर्षांवरील व पंधरा वर्षांआतील मुलांच्या गटात पियुष गायधनी (चिमूर, चंद्रपूर)यांचा द्वितीय तर मुलींच्या गटात रुचिका नागरकर(चंद्रपूर) हिचा द्वितीय क्रमांक आला. या चारही धावपटूंना तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रुपेरी सन्मानपदक प्रदान करण्यात आले.पंधरा वर्षांवरील खुल्या गटातून पुरुष विभागात सनी फुसाटे (वर्धा) याने तृतीय तर महिला गटातून अभिलाषा भगत (राजुरा ,चंद्रपूर) हिने तृतीय क्रमांक पटकावला.दहा वर्षांवरील व पंधरा वर्षांआतील मुलांच्या गटात अभय मस्की (नागपूर) याने तृतीय क्रमांक तर मुलींच्या गटात  सेजल चौधरी ( वर्धा) हिने तृतीय क्रमांक पटकावला. या चारही धावपटूंना दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, सन्मानपदक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत यवतमाळ, चंद्रपूर,नागपूर,अमरावती, गोंदिया भंडारा, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांतील  ९७४ धावपटू सहभागी झाले.


सकाळी सात वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे अध्यक्षतेखाली वणीचे आमदार  संजीवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते आझादी की दौड स्पर्धेचे उद्घाटन झाले.स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ झाला.यावेळी वणीचे ठाणेदार अनिलकुमार बेहराणी, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख  सहसचिव अशोक सोनटक्के, कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे, अनिल जयस्वाल,नरेश मुणोत,सुरेश शुक्ल,माजी आमदार विश्वास नांदेकर,लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर,वणी लाॅयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक महेंद्र कुमार श्रीवास्तव, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे ,स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.उमेश व्यास, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा.पुरुषोत्तम गोहोकार वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य चित्रा देशपांडे, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर, वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक सीता वाघमारे,हे विचारपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. मनोज जंत्रे यांनी केले तर प्रशांत गोडे यांनी आभार मानले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक प्रा उमेश व्यास, क्रीडा शिक्षक प्रा.कमलेश बावणे, किरण बुजोणे ,रूपेश पिंपळकर, इंदु सिंग, यांचेसह लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय,वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल  कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संस्थांमधील सुमारे दोनशे पन्नास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , वाहतूक पोलीस, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.