Ticker

6/recent/ticker-posts

वणीत विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेची जय्यत तयारी

 

सुमारे सतराशे धावपटूंची नोंदणी.२९ ऑगस्टला होणार स्पर्धा 

News Today 

दिलीप भोयर

वणी :-  येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त  येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विदर्भस्तरीय 'आझादी की दौड ' स्पर्धेची 

जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण विदर्भातून धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

साडे चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होईल.'अ' गटात १० वर्षावरील ते १५ वर्षांआतील वयोगटातील मुले  व मुली असे दोन विभाग आहेत.'ब' गट १५ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून या गटात स्त्री व पुरुष असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांस अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजारांची रोख पारितोषिके, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. एकूण चाळीस हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांतून सर्व गटातील सुमारे सतराशे धावपटूंनी नोंदणी केली आहे.

२९ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयात या स्पर्धेचे  स्पर्धेचे उद्घाटन  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार यांच्या अध्यक्षतेत वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते होईल. स्पर्धा आटोपल्यानंतर ताबडतोब पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.


वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी, वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक सीता वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेन्द्र सुलभेवार, गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी ही स्पर्धा उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात यशस्वी होण्यासाठी  आवश्यक त्या सोयी सुविधांचा व एकूणच व्यवस्थापनाचा आढावा घेतला आहे.स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.उमेश व्यास यांच्या नेतृत्वात विविध समित्या तयार केल्या असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे.


या स्पर्धेच्या तयारीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया सचिव सुभाष देशमुख सहसचिव अशोक सोनटक्के,सर्व कार्यकारिणी सदस्य, लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, राजाभाऊ पाथ्रडकर व सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य सुधाकर रेड्डी, स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.उमेश व्यास, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर, मुख्याध्यापक प्रशांत गोडे , प्राचार्य वर्षा देशपांडे, , क्रीडा शिक्षक प्रा.कमलेश बावणे, किरण बुजोणे ,रूपेश पिंपळकर, इंदु सिंग, अनिल निमकर, दत्तात्रय मालगडे, अरविंद गारघाटे यांचेसह लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय,वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल  कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संस्थांमधील सुमारे दोनशे पन्नास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम करीत आहेत.

           —-------------------------

“ स्पर्धकांचा सहभाग लक्षणीय असा आहे. विदर्भस्तरीय 'आझादी की दौड’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.” असे आवाहन या स्पर्धेच्या तयारीसाठी लोकमान्य टिळक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय,वणी लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सभेत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया,सहसचिव अशोक सोनटक्के, कार्यकारिणी सदस्य नरेश मुणोत हे मान्यवर उपस्थित होते.