Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन


News Today 

प्रतिनिधी

वणी :- मोफत गणवेश योजनेबाबत संभाजी ब्रिगेड चे वतीने जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना उपविभागीय अधिकारी,वणी यांचे मार्फत निवेदन दिले.

या निवेदनानुसार शैक्षणिक सत्र 2024-25 सुरु होऊन दोन महिने उलटून गेले आहे.आणि देशाचा स्वातंत्र्यदिन सोहळा सुद्धा पार पडला.मात्र आपल्या जाहिरातबाज गतिमान सरकारने अद्यापपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे मिळणारे मोफत गणवेश दिलेले नाहीत.राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील हीच स्थिती असून ज्या ठिकाणी गणवेश प्राप्त झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत.त्यांची मापे सुद्धा अयोग्य आहेत.ग्रामीण व शहरी भागातील सरकारी शाळांतून गोरगरीब विद्यार्थी शिकत असतात.त्यांच्यासाठी नवीन कपडे घालण्याची हीच एकमेव संधी असते.मात्र आपल्या असंवेदनशील सरकारने त्या विद्यार्थ्यांची ही संधी हिरावून घेत त्यांचा अपमान सुद्धा केलेला आहे. स्वातंत्र्यदिनासारखा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण त्या विद्यार्थ्यांना जुन्या फाटक्या कपड्यामध्ये साजरा करावा लागला. फक्त लाडक्या बहिणीकडे लक्ष देणाऱ्या सरकारने भाच्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित दर्जेदार गणवेश उपलब्ध करून द्यावे,अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वेळेस अजय धोबे यांचेसह मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, एड अमोल टोंगे,भाउ साहेब आसुटकार,दत्ता डोहे,दिनेश बलकी आदी उपस्थित होते.