Ticker

6/recent/ticker-posts

पृथ्वीवर अवतरले चंद्रावरील खड्डे

 

सा. बां. विभाग, कंत्राटदार व लोकप्रतिनिधींची कृपादृष्टी

Wani Today

वणी :- येथील नांदेपेरा मार्गावरील नुकत्याच बनवलेल्या रस्त्यावर जणू चंद्रावराचे खड्डे अवतरले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. असे खड्डेमय रस्ते तयार करून जनतेला मरण यातना भोगायला लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदार व  सत्तेतील लोकप्रतिनिधींच्या अपार कृपादृष्टी हे चित्र बघायला मिळत असल्याची चर्चा सद्या जिकडे तिकडे जोर पकडत आहे.

वणी - नांदेपेरा - मार्डी - वडकी हा राज्यमार्ग असून नुकत्याच दोन महिन्यापूर्वी या मार्गावर करोडो रुपये खर्ची घालून आर. व्हीं. उंबरकर या कंत्राटदार कंपनी कडून रस्ता बांधण्यात आला आहे. या मार्गाची निविदा ही आर. व्हि. उंबरकर या कंत्राटदाराला देवू नये अशी मागणी देखील परिसरातील जनतेनी निवेदन व्दारे केली होती परंतु एक म्हण आहे. "अल्ला मेहेरबान तो गधा पैलवान" अशीची स्थिती या निविदेच्या वेळी घडली आहे. सत्तेतील लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने याच कंपनीला हा कंत्राट देण्यात आला व तो मार्ग देखील बांधकाम करून घेतला आहे. निविदा प्रणालीतील कोणत्याही नियम व अटी असल्या तरी सत्ताधारी लोकप्रतिनिधी जर सोबत असेल की मग रस्त्याचे बांधकाम कोणत्याही दर्जाचे झाले तरी रस्ता त्याची देयके मात्र कमिशन स्वरुपी प्रसाद चढवला की ते सरळ मार्गाने देण्यात येतात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे अधिकारी नसून केवळ कमिशनचे शेन खाणारे स्वान झाले आहेत. त्यांची जबाबदारी व कर्तव्यात: विसरून नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवून जनतेच्या तिजोरीतील करोडो रुपये उधळून कंत्राटदार व लोकप्रतिनिधीचे घर भरीत असतात यात ते स्वतः ही चांगली खळगी भरून घेत असतात त्यामुळे रस्ते वाहतुकीस योग्य झाले की न झाले तरी त्यांना कोणत्याच फरक पडत नाही. म्हणून चंद्रावर ज्या पद्धतीने मार्ग भ्रमण करण्याची अनुभूती येत असते तशीच अनुभूती मात्र आता वणी विभागातील रस्त्याने मार्ग भ्रमण करणाऱ्या नागरिकांना येत आहे. आता कोणालाही चंद्रावर जावून चंद्राचे सौंदर्य बघायची इच्छा होत असेल त्यांनी वणी विधानसभेतील आर. व्ही. उंबरकर या कंपनीने बनवलेल्या रस्त्याने मार्ग भ्रमण करून चंद्रावर चालत असल्याचे अनुभव घेण्यास कोणतीच हरकत असणार नाही. व यासाठी सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी यांचे देखील आभार मानावे तेवढे कमी पडतील अशी चर्चा सुरू आहे.