Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंतांच्या महासमाधी वरून 'प्रबोधन वारी'चा सत्यपाल महाराजांच्या हस्ते शुभारंभ

 

विदर्भात गाजणार साप्तखांजेरी व्दारे राष्ट्रसंतांच्या विचारांचा गजर 

News Today

अमरावती :-  गुरुकुंज मोझरी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून राष्ट्रसेवेची योजना आखली होती त्यावेळी चाळीस हजार गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा होत्या परंतु आज त्या शाखा झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येते. गावागावातील शाखा ना भेटी देऊन त्यांचे पुनर्बांधणी करण्याची गरज लक्षात घेता श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल द्वारे 'वारी प्रबोधनाची' हा उपक्रम संपूर्ण विदर्भात राबविण्यात येणार आहे. याचे रीतसर उद्घाटन रविवारी पहाटे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावर सप्तखंजिरी वादक सुप्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, नामदेवराव गव्हाळे, इंजिनीयर भाऊसाहेब थुटे , ज्ञानेश्वर रक्षक, प्रेमकुमार बोके, नरेंद्र जीवतोडे, देविदास लाखे, नामदेव अस्वले, राज घुमणार, अमर वानखडे प्रशांत सुरोशे, रोशन ठाकरे, पवन खरासे इत्यादी कार्यकर्ता मंडळी व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजरी वादक प्रबोधनकार संदीपपाल महाराज, रामपाल महाराज, पवन दवंडे ,तुषार सूर्यवंशी ,पंकजपाल महाराज,दीपक भांडेकर, दीपक नरताम, दिलीप भोयर, विकास चिडे ,उदयपाल महाराज, आकाश ताविडे, प्रदीपपाल चौधरी इत्यादी प्रबोधनकार मंडळींनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

गाव हा विश्वाचा नकाशा आहे गावावरूनच देशाची परीक्षा केल्या जाऊ शकते म्हणून आदर्श राष्ट्राची निर्मिती करायची असेल त्यासाठी गाव हे आदर्श असले पाहिजे व आदर्श गाव होण्याकरिता आदर्श गावाची संहिता म्हणजे ग्रामगीता ही गावोगावी पोहोचली पाहिजे ग्रामगीतेचे प्रचारक हा विचार घेऊन गावा-गावांपर्यंत पोहोचुन तेथली युवकांना संघटित करून व प्रशिक्षित करून सेवा मंडळाचे कार्यकर्ते बनवल्या जाईल असा विश्वास वारीच्या उद्घाटन समारंभात प्रास्ताविक भाषणामध्ये बोलताना रवी मानव यांनी व्यक्त केला. ही प्रबोधनाची वारी गुरुदेव सेवा मंडळासाठी नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार आहे असा विश्वास सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केला. 


अनेक निष्ठावंत प्रचारकांनी कष्टाची शर्त लढवून गुरुदेव सेवा मंडळ गावागावात निर्माण केली होती आता ती सांभाळण्याची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांवर आलेली आहे व ते हे कार्य निष्ठेने करताना दिसतात याचे समाधान मला आहे असे उद्गार ज्येष्ठ प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी याप्रसंगी बोलून दाखवले.

शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पडला या समारंभाच्या यशस्वीतेसाठी सौ छाया मानव,प्रज्वल टोंगे, तुलसीदास झुंजुरकार, हर्ष बारापात्रे,आर्यन बोबडे, स्वप्निल बारापात्रे यांनी परिश्रम घेतले. अमर तावडे यांच्या मधुर आवाजात 'चलो अब सच कामोकी और' हे भजन सामूहिक रीत्या म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.