Ticker

6/recent/ticker-posts

भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे वणी येथे जातनिहाय जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत भव्य धरने संपन्न

 

News Today 

प्रतिनिधी

वणी :-  आज 30 आॅगष्ट रोजी संपुर्ण राज्यभर भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.त्याअनुषंगाने यवतमाळसह वणी उपविभागीय कार्यालयासमोर दिवसभर प्रचंड धरणा आंदोलन करुन मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन देण्यात आले.वणी विधानसभा मतदारसंघाचे नेते कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे,सहसचिव बंडु गोलर यांचे नेत्रुत्वात दिलेल्या निवेदनात1) जातनिहाय जनगणना करण्यात यावी व शिक्षणातील,नौकरयातील आरक्षणतील 50% आरक्षणाची मर्यादा उठवावी.2) शेतकरयांच्या शेती पिकाला किमान हमी भावाचा कायदा करावा,म्हणजेच स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी करावी.3)अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावी,अतिक्रमीत शेतकरयांना नुकसान भरपाई देण्यात यावी.या आणी अन्य मागण्या करण्यात आल्या.दिवसभर चाललेल्या धरणा आंदोलनात विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.