Ticker

6/recent/ticker-posts

दहा वर्षात १ हजार कोटीचे काळेधन गोळा करणारा लोकप्रतिनिधी कोण ?

 

वणी विधानसभा क्षेत्रातील तारांकित  चर्चा

दिलीप भोयर

News Today 

वणी :-  वणी विधानसभा क्षेत्रातील एका लोकप्रतिनिधींनी केवळ दहा वर्षात सुमारे १ हजार कोटी रुपयाचे काळेधन गोळा केल्याची जोरदार चर्चेला उत आला आहे. त्यामुळे हा जनतेशी बेइमानी करणार लोकप्रतिनिधी कोण ? असा प्रश्न  सर्व मतदार बांधवांमध्ये निर्माण झाला व भ्रष्टाचाराचा हा "बोध" अत्यंत "क्रुर" होत असून जनतेच्या तिजोरीवर "वार" करीत आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात दगडी कोळशाच्या खानी मोठ्या प्रमाणात असून दररोज लाखो रुपयांचा कोळसा  दररोज चोरल्या जात आहे. यातील मोठा हिस्सा सत्तेत बसलेल्या एका लोकप्रतिनिधीला मिळत आहे. त्यातच गौण खनिज देखील मोठ्या प्रमाणात उत्खनन आहे. त्यातून दरवर्षी स्थानिक विकास कामासाठी कोट्यावधी खनिज निधी प्राप्त होत आहे. हा निधी  लोक कल्याणासाठी वापरायला पाहिजे परंतु लोकप्रतिनिधी स्वकल्यानासाठी वापरत असल्याचे आरोप जनतेतून होताना दिसून येत आहे. तसेच सर्वाधिक निधी हा विधानसभेतील रस्त्यांना मिळाला असून संबंधित रस्ते पुर्णतः नित्कृष करून ५०० कोटींचे बिल उखडण्यात आले आहे. यातून शेकडो कोटी रुपये कमिशन हळप केले आहे. विकासाच्या नावाखाली स्व - विकास करून जनतेच्या पैशाला चुना लावून मतदारांना "मामा" बनवत आहे. इतर विकास कामासाठी आलेल्या निधीतून देखील शेकडो कोटी हळप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.



वणी शहराच्या सभोवताल शेत्या आणि ले आऊट टाकल्यात आले आहे. शहरातील अनेक प्रमुख ले आऊट मध्ये पत्नीच्या नावाने हजारो स्केअर फूट जागा ले आऊट धारकांना रस्ते जोडून मोफत नावाने करून घेतली आहे.



 दहा वर्षापूर्वी कर्ज बाजारी असलेले लोकप्रतिनिधी आजच्या स्थितीला १,००० कोटीच्या वर संपत्ती तयार केली आहे. त्यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात  शि - थू होताना दिसून येत आहे. शेवटी हा लोकप्रतिनिधी कोण असा प्रश्न जरी पडला असला तरी हा चोर भ्रष्ट्राचारी लोकप्रतिनिधी सर्वांना माहीत आहे. 



जीनिंगमध्ये जाणाऱ्या वाहनातील  वजनातून कापसाची चोरी

काही वर्षा अगोदर शेतकरी आपला कापूस जीनिंग मध्ये विकायला गेल्यानंतर त्यांच्या वाहनातील ५० किलो वजन कमी  करून कापूस सर्रास हळप करण्याचा गोरख धंदा वणी विधानसभेतील एका लोकप्रतिनिधींचा होता. कापूस चोऱ्या लोकप्रतिनिधींकडून जनतेनी विकासाची आस पकडावी म्हणजे दिव्या खाली अंधारच म्हणावा लागेल. तसेच काही वर्षा अगोदर १ रुयाचा फवारणी पंपाचे वायसर विकणारा हा व्यावसायिक अपघाताने लोकप्रतिनिधी '"मामा'" बनाताच १ हजार कोटी रुपयांचा मालक बनला आहे. अशी गोपनीय माहिती त्यांच्याच पक्षातील निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली आहे.

 *या भ्रष्ट नेत्याने मुलीच्या व जावयाच्या नावाने कोण कोणत्या शहरात घेतले करोडीचे फ्लॅट वाचा पुढच्या बातमीत*