Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वेखाली येवून इसमाचा मृत्यू, वणी तालुक्यातील कोणा जवळील घटना

 

दिलीप भोयर

News today 

वणी :- नागपूर कडून वणी येणाऱ्या रेल्वेने एका इस्मास चिरडल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज ता. ९ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोणा जवळील रेल्वेच्या पुला नजिक घडली असून महादेव परचाके वय ७० वर्ष असे मृतकाचे नाव आहे. पुढील कारवाई सुरू आहे.


तालुक्यातील कोणा येथील रहिवासी असलेले तसेच ग्राम पंचायतीचे माजी सरपंच असलेले महादेव परचके हे वयोवृध्द असून ते रेल्वेच्या पूला वरून जात असताना अचानक नागपूर वरून कोल्हापूर जाणारी धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एकास्प्रेस आली व त्यात ते रेल्वेच्या खाली आले व त्यात ते चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.