Ticker

6/recent/ticker-posts

*लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल करण्यात यावे - अन्यथा मोठया प्रमाणात लाडकी बहिण या योजनेचे लाभ मिळण्या पासून वंचित राहतील :- आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र शासनाला आव्हान*

 

प्रतिनिधी

News today 

यवतमाळ :- लाडकी बहीण योजनेतील किमान वयोगट 21 वर्षे पासून 16 वर्ष करण्यात यावा - त्यामुळे बरेच महिला,  लाडकी बहीण जे विध्यार्थी असतात त्यांना लाडकी बहीण योजनेतील निधी आपल्या शिक्षणा करीता सहायक खर्च म्हणून काही प्रमाणात उपयोगी ठरतील. जास्तीत जास्त वय मर्यादा 65 असून अनेक वृद्ध महिलांना लाभ नाही मिळणार. जरी 65 वर्षा वरील महिला निराधार चा लाभ घेत असणार तरी ही योजना अतिरिक्त सहायताच्या उद्धीष्टने असल्यामुळे सर्व निराधारच्या महिला लाभार्थीना या योजनेत शामिल करण्यात यावे. फोर व्हिलर टी.वी फ्रीझ कूलर फॅन असल्यास योजने पासून वंचित असण्याची अट काळण्यात यावी.

लाडकी बहीण योजने पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कोणतेही योजने अंतर्गत मदत मिळाल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नसल्याची ही अट काळण्यात यावे व लाडकी बहिण योजनेत नोंदणी करीता देण्यात आलेली  31 ऑगस्ट 2024 तारीख म्हणून ही शेवटची अट ला काळन्यात यावे जेणेकरून 31 ऑगस्ट 2024 नंतर योजने करीता किमान आवश्यक वयाच्या अटीत बसणारी लाडकी बहिणींना या योजनेचा लाभ घेता येईल. 21 ते 65 वर्ष वयोगटातील व इत्तर सर्व निराधार लाभार्थी महिलाना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावे कारण निराधार महिलांचा जीवन सामान्य महिला पेक्षा अधिक कठीण असतो तरी लाडकी बहिण योजने अंतर्गत जर सहायक निधी मिळाली- लाभ मिळाला तर त्यांचे दैनिक जीवन मध्ये त्यांना हा लाभ अधिक महत्वाचे ठरणार हे 

वरील अटी मुळे जनतेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी खुप त्रास होणार आहेत व लाखोच्या संख्येत लाडकी बहीण शासनाच्या या योजने पासून वंचित राहतील व वरील अटी मुळे महाराष्ट्र शासनाचा जनकल्याणचा हेतू असण्याचा चित्र दिसत नाहीत व वरील अटी मुळे ही योजना निरर्थक सिद्ध होनार असल्याची बाब लक्षात घेता, त्याकरीता वरील अटी काळून जास्तीत जास्त लाडकी बहिणीला या योजनेचे लाभ मिळेल करीता लाडकी बहिणीच्या हितार्थ - जनहितार्थ आम आदमी पार्टी ची मांगणी पूर्ण करण्यात यावी अशी मांगणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली.

. या वेळी आपचे गुणवंत इंदूरकर, विलास वाडे, अविनाश धनेवार, प्रशांत देवकते,आकाश चमेडिया, निलेश नंदुरकर, नागेश्वर भुते,सचिन शेळके सह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.