Ticker

6/recent/ticker-posts

घुगुस मध्ये लागले ट्रापिक सिग्नल लाईट, वणीत मात्र प्रतीक्षा संपेना

 

                वणीत लोकप्रतिनिधींच्या सुस्तपणा कारणीभुत

दिलीप भोयर

News Today 

वणी :- वणी पेक्षा दहापटीने वाहतुकीची वर्दळ असलेल्या घुगुस नगर परिषद हद्दीतील बस स्थानक चौकात नुकतेच वाहतूक नियत्रंण करण्यासाठी सिग्नल लाईट लागले असून वणीत मात्र या सिग्नल लाईटची  प्रतीक्षा संपता संपत नाही या सुस्त कारभाराला स्थानिक लोकप्रतिनिधी कारणीभूत असल्याचे आरोप जनमानसातून केल्या जात आहे.


वणी शहरातील छ. शिवाजी महाराज चौक, बस स्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक  टॉकीज चौक, गांधी मार्केट चौक खाती चौक, व इतर काही ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत असून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोणतीही ठोस पर्याय योजना नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला याचा जोरदार फटका बसत आहे. 


वणी शहराच्या तुलनेत घुगुस शहर मात्र अत्यंत लहान शहर असून पाहिजे तेवढी बाजार पेठ देखील नाही. तरी देखील या ठीकाणच्या बस स्थानक चौकात प्रवाशांच्या जिवाची कोणतीही हानी घडू नये व वाहतुकीवर नियंत्रण असावे या करिता रस्त्यावर सिग्नल लाईट लागले आहे. ही सिग्नल लाईट वणी शहराला वाकुल्या दाखवत असून लोकप्रतिनिधींची उदासीनता याला सर्वस्वी कारणीभूत ठरत असल्याची ओरड आता जनमानसातून केल्या जात असल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेसारखी परिस्थिती उद्भवल्यास सत्तेतील पक्षाची व विद्यमान लोकप्रतीनिधिंची मात्र चांगलीच दाणादाण उडणार आहे. असे चित्र उभ होत आहे.

           मुख्य चौकात दररोज अपघात

शहरातील प्रमुख चौकात ट्रापीक सिग्नल अभावी दररोज छोटे मोठे अपघात होत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहतुकीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. ज्यामुळे बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल.