Ticker

6/recent/ticker-posts

छोरीया ले आऊट मधील बोगस डॉक्टरवर कारवाईसाठी आरोग्य विभागाची नकार घंटा

 

अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात,  दिलीप अडकीने यांचा आरोप 

डी.एस. अडकिने 

News Today

वणी :- येथील छोरिया ले आऊट मधील एका बोगस डॉक्टरच्या विरोधात रीतसर तक्रार देवून देखील तालुका वैधकिय विभागाने कारवाई करण्यासाठी नकार घंटा वाजविल्याने उपचारासाठी जात आलेल्या रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहे. असा आरोप दिलीप अदकिने यांनी केला असून तत्काळ कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

छोटिया ले आऊट मध्ये महेश खुराणा नामक एक बोगस डॉक्टर असून त्यांचेकडे वैधकीय क्षेत्रातील कोणतीही पदविका नाही. तरी देखील ते रुग्णांचे उपचार करीत असतात व प्रतिरुग्न १५० रुपये घेत असतात दररोज शेकडो रुग्णांची तपासणी बोगस पद्धतीने करीत असून जनसामान्य रुग्णांना आर्थिकरित्या लुटत असतात. त्यामुळे चुकीच्या उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे वेळ निर्माण होत असताना देखील तालुका वैद्यकीय विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने जनमानसात रोष निर्माण झाला आहे. बोगस या डॉक्टरावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी तक्रार देखील दिलीप अडकिने यांनी एक महिण्यागोदर केली असून या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. यात बोगस डॉक्टरला वाचविण्यासाठी राजकीय यंत्रणा कामी लागली असून तालुका वैधकित अधिकारी देखील डोळेझाक करीत असल्याचे गंभीर आरोप दिलीप अडकिने यांनी केले आहे.